राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.
जयपूर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.
आयरन फिस्टच्या खास कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय वायूसेनेच्या 181 लढाऊ विमानांनी आपल्या शक्तिचं प्रदर्शन केलं. त्यात भारतानं विकसित केलेल्या सर्वात हलकं लढाऊ विमान तेजसचाही समावेश आहे. याशिवाय आकाश क्षेपणास्त्र, रोहिणी रडार आणि इंटिग्रेटेड़ कमांड कंट्रोलचंही प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आलं. वायूसेनेच्या विमांनी दाखवेल्या या कवायतींनी उपस्थितांची मनं जिंकली