जम्मू-कश्मीरमधून पीओकेमधील एका व्यक्तीला घेतलं ताब्यात
जम्मू-कश्मीरमधील पुंछमधून लष्काराने एकाला अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे. लष्कराने तपासादरम्यान पीओकेमधील एका नागरिकाला अटक केली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पुंछमधून लष्काराने एकाला अटक केल्याची माहिती आता समोर आली आहे. लष्कराने तपासादरम्यान पीओकेमधील एका नागरिकाला अटक केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार सर्च ऑपरेशनदरम्यान या पीओकेमधील मोहम्मद राशिद याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 42 वर्षाच्या या व्यक्तीला लुनावाली पोस्टमधील साउजियान सेक्टरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्या व्यक्तीची कसून चौकशी होत आहे. अजून याबाबतची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.