नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकनंतर दहशतवादी हे पीओके मधून फरार झाले असले तरी ते आणखी दिवस लपून बसू शकणार नाहीत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतीय गुप्तचर यंत्रणा या संधी मिळाली तर अमेरिकेप्रमाणे पाकिस्तानात जाऊन कोवर्ट ऑपरेशनने हाफिज सईद आणि दाऊदची खात्मा करण्याची क्षमता ठेवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा यंत्रणांच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, पाकिस्तानजवळ आम्ही मजबूत नेटवर्क तयार केलं आहे आणि गरज पडल्यास कोवर्ट आपरेशन करु शकतो. मोदी सरकारने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या निर्णयानंतर सुरक्षा यंत्रणांचा विश्वास आणखी वाढला आहे. त्यांना विश्वास आहे की ते पाकिस्तानमध्ये लपलेल्या शत्रूंचा पाकिस्तानात जाऊन खात्म करतील. फक्त सरकारच्या आदेशाची गरज आहे.


पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला नकार देत पाकिस्तानने पुरावे मागितले आहेत. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना कडक शब्दात प्रत्यूत्तर दिलं आहे. राजनाथ सिंह बोलले की, 'वाट पाहा आणि बघा'.