लेह :  चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात लद्दाखच्या बर्फाच्छादित परिसरात विरोध सुरू आहे. या भागात मनरेगाअंतर्गत सिंचनासाठी कॅनॉलचे बांधकाम सुरू होते. हे काम रोखण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीचे जवान घुसले. पण भारतीय सैनिकांनी त्याची ही घुसखोरी रोखून त्यांना मारून हाकलून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेहपासून २५० किलोमीटरवर असलेल्या अपराह्न देमचोक सेक्टरमध्ये  चीनचे ५५ सैनिक घुसले. त्यांनी बळाचा वापर करून मनरेगाचे काम रोखले. पण त्या ठिकाणी भारत-तिबेट सीमा पोलीसांच्या जवानांनी जाऊन चीनच्या घुसखोरीला रोखले. 


चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषेवर गेले. दोन्ही देशांच्या सहमतीशिवाय काम करता येणार नाही, या युक्तीवाद त्यांनी मांडला. पण भारताकडून या दाव्याचे खंडन करण्यात आले. कोणतेही बांधकाम संरक्षणासंदर्भात नसेल तर त्याची सहमती घेण्याची गरज नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.