पाकिस्तानातील हिंदुसाठी केंद्र सरकारची खुशखबर
भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : भारतात अनेक दिवसांपासून वीजावर राहणाऱ्या पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांना लवकरच संपत्ती खरेदी करण्याचं आणि बँक अकाउंट उघडणे, पॅन कार्ड, आधार कार्ड मिळणं शक्य होणार आहे.
मोदी सरकार अशा लोकांसाठी विशेष सुविधा आणि योजना बनवत आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तानच्या अल्पसंख्यांक लोकांच्या बाबतीत कोणतीच माहिती नाही. जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर, अहमदाबाद, राजकोट, कच्छ, भोपाळ, इंदौर, मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली आणि लखनऊ या शहरांमध्ये पाकिस्तानी हिंदूच्या जवळपास ४०० वसाहती आहेत.
गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,'केंद्र सरकार भारतात अनेक दिवसांपासून राहणाऱ्या पाकिस्तानातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या काही अडचणी कमी करण्याच्या विचारात आहे. पण यासाठी काही अटी देखील ठेवण्यात येणार आहेत.'