नवी दिल्ली : उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत. 


गृहमंत्री राजनाथ सिंहांच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल, लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग,  रॉ, आणि आयबीचे प्रमुख, बीएसएफचे महासंचालक, सीआरपीएफचे महासंचालक, गृहसचिव राजीव मेरहाषी, अशा सर्वोच्च अधिकारी वर्गाची बैठक झाली. या बैठकीत काल झालेला हल्ला, त्याची कारणं आणि त्याला उत्तर देण्यासाठी भारतासमोर उपलब्ध असलेल्या पर्यायांवर दीड तास चर्चा झाली.