भारतीय रेल्वेला १६३ वर्षे पूर्ण
ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या भारतीय रेल्वेला १६३ वर्ष पूर्ण झालीत. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती.
नवी दिल्ली : ब्रिटीशकाळात सुरु झालेल्या भारतीय रेल्वेला १६३ वर्ष पूर्ण झालीत. १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती.
या दिवशी सिंध, सुलतान आणि साहिब या तीन इंजिनाद्वारे धावणारी ही ट्रेन दुपारी 3 वा. 35 मिनिटांनी बोरीबंदरवरुन निघून सव्वा तासात ठाण्यात पोहचली होती. या ऐतिहासिक क्षणाला १६३ वर्षे पूर्ण झालीत.
गेल्या १६३ वर्षात रेल्वेत अनेक बदल झालेत. नव्या वर्षात पदार्पण करताना भारतीय रेल्वेची वाटचाल आधुनिकीकरणाकडे होतेय. भारताच्या आर्थिक, लष्करी, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवण्यात देशाच्या या लाइफलाईनचा सिंहाचा वाटा आहे.