मुंबई : जगातील सर्वात लग्जरी रेल्वेमध्ये समावेश असलेल्या या भारतीय रेल्वेतून प्रवास करणं कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यासारखं आहे. जगातील लग्जरी रेल्वेमध्ये हिचा चौथा क्रमांक लागतो. पॅलेस ऑन व्हील्स भारतातील ६ लग्जरी रेल्वेपैकी एक आहे. पॅलेस ऑन व्हील्समध्ये प्रवास करण्याचं एका रात्रीचं भाडं प्रत्येकी ६०० डॉलर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२३ डब्बे असलेल्या या रेल्वेत १४ सलून, एक स्पा, २ रेस्ट्रॉरन्ट आणि एक रिसेप्शन कम बार आहे. यामध्ये १०४ प्रवासी राजेशाहीत प्रवास करु शकतात. ही रेल्वे ७ दिवसात राजस्थानातील मुख्य ऐतिहासिक स्थळं दाखवते. यामध्ये आग्रा येथील ताज महलचा देखील समावेश आहे. ही ट्रेन जयपूर, सवाई माधोपूर, चित्तौडगड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर आणि आग्रा हे स्थळांवरुन जाते.



रेल्वेतील सर्व कोचमधील इंटीरीअर हे महलाप्रमाने आहे. या रेल्वेत वाईन आणि थंड पेय देखील मिळतात. भारतीय, युरोपीयन, चिनी जेवन या रेल्वेची खासियत आहे. शिवाय हनीमुनसाठी देखील ही रेल्वे सुविधा पुरवते.