भारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानकं
भारतीय रेल्वे स्थानक अस्वच्छ असल्याचं अनेक जण सांगतात पण तुम्हाला माहित आहे का भारतात कोणते रेल्वे स्थानक अधिक अस्वच्छ आहे. भारतीय रेल्वेच्या एका सर्वेमध्ये अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील एक स्थानक सर्वात अस्वच्छ आहे.
मुंबई : भारतीय रेल्वे स्थानक अस्वच्छ असल्याचं अनेक जण सांगतात पण तुम्हाला माहित आहे का भारतात कोणते रेल्वे स्थानक अधिक अस्वच्छ आहे. भारतीय रेल्वेच्या एका सर्वेमध्ये अस्वच्छ स्थानकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातील एक स्थानक सर्वात अस्वच्छ आहे.
भारतातील १० अस्वच्छ रेल्वे स्थानक
१. महाराष्ट्रातील पुणे हे देशातील सर्वात अस्वच्छ स्थानक असल्याचं समोर आलं आहे.
२. उत्तर प्रदेशातील मुगलसराय अस्वच्छ स्थानकाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
३. उत्तर-पूर्व भारतातील आसाममधील गुवाहाटी स्टेशन देशात याबाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे.
४. राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्टेशन अस्वच्छ स्थानकांच्या बाबतीत चौथ्या स्थानकावर आहे.
५. पश्चिम बंगालमधील सियालदह पाचव्या स्थानकावर आहे.
५. यूपीमधील कानपूर देशात याबाबतीत सहाव्या स्थानावर आहे.
७. मध्य प्रदेशातील भोपाळ स्टेशन या यादीत सातव्या स्थानावर आहे.
८. बिहारमधील मुजफ्फरपूर देशात आठव्या स्थानावर आहे.
९. दक्षिण भारतातील केरलमधील त्रिशूर हे स्थानक नवव्या स्थानावर आहे.
१०. यूपीमधील वाराणसी हे स्थानक अस्वच्छ स्थानकांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे.