`काँग्रेस हितासाठी इंदिरांनी नोटबंदी नाकारली`
1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
नवी दिल्ली : 1971मध्ये अर्थमंत्री असताना यशवंतराव चव्हाण यांनी नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, पण काँग्रेसच्या हितासाठी इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. निवडणूकांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून इंदिरा गांधींनी हा प्रस्ताव फेटाळला आणि अर्थव्यवस्थेची वाट लावली, अशी टीकाही मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णय़ाचं जोरदार समर्थन करत भाजपच्या संसदीय बोर्डासमोर भाषण केलं.