इंदोर : हायप्रोफाईल संत भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाहाच्या बेडीत अडकणार आहेत. ग्वालियरच्या डॉ. आयुषी शर्मा हिच्याशी ते विवाह करणार आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर दीड वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. नोव्हेंबर २०१५ मध्ये माधवी यांचं निधन झालं होतं. त्या औरंगाबादमध्ये राहत होत्या. या दोघांची १५ वर्षांची मुलगी कुहू सध्या पुण्यात शिकतेय. 


सद्गुरू दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आईच्या आग्रहामुळे भय्यू महाराज यांनी दुसऱ्या विवाहाचा निर्णय घेतलाय. हा विवाह समारंभ ३० एप्रिल रोजी सिल्व्हर स्प्रिंग क्लब हाऊसमध्ये सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे.