लखनऊ : उत्तर प्रदेशात एका आयएसआयच्या एजंटला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला हा एजंट आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतले असून तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती पुढे आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादविरोधी पथक आणि राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. फैजाबाद येथून पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयच्या एजंटला अटक केली. याशिवाय एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आफताब अली असे त्याचे नाव असून तो फैजाबादमधील ख्वासपुरा येथील रहिवासी आहे.
 
आफताब अली याने आयएसआयकडून हेरगिरीचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तो पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती आहे. 


दरम्यान, आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेला एजंट हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि खोट्या नावाने त्यांच्याशी संपर्क साधत होता, अशी माहिती समोर आहे. 
आफताब अली पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, अनेकदा त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याने आयएसआयसाठी काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला होता, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.