भारतीय तरुणांना आकर्षित करतेय ही आयसीसची सुंदर तरुणी
तरुणींना देखील दहशतवादाचं प्रक्षिक्षण
मुंबई : जगभरात जे दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा सर्वात भयानक दहशतवादी संघटना आयसीस आता तरुणींना देखील दहशतवादाचं प्रक्षिक्षण देत आहेत. आयसीसची अशीच एक दहशतवादी आयशा हामिडन ही सध्या संघटनेमध्ये नव्या तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सुरक्षा यंत्रणा याच्या चौकशीमध्ये लागली आहे. एएनआईने फिलीपिंसकडून या तरुणीबाबत माहिती मागवली आहे. एएनआयने असा दावा केला आहे की, भारतात अटक करण्यात आलेल्या २ दहशतवादी हे या हामिडनच्या संपर्कात आहेत.
एएनआई सध्या प्रकरणाच्या चौकशीत लागली आहे. या तरुणीबाबतचे सर्व पुरावे एएनआय गोळा करत आहे.