श्रीहरिकोटा : रविवारी इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. इस्त्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन सकाळी सहा वाजता तीन टन वजनाच्या RH-560 सुपरसॉनिक स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी यशस्वीपणे पार पडली.


यामुळे अवकाशात सोडल्या जाणा-या उपग्रहासह आणि अवकाशयानांचा उड्डाण खर्च चांगलाच कमी व्हायला मदत होणार आहे.