श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एका दमात 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम करणार आहे. आज सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटाहून इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक पीएसएलव्हीच्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे. 


या प्रक्षेपणात पृथ्वीची अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रे काढणारा 714 किलो वजनाचा कॅरटोसॅट 2 हा उपग्रह पाठवला जाणार आहे. मोहीम यशस्वी झाली तर पीएसएलव्ही प्रक्षेपकाची सलग 36 वी यशस्वी व्यावसायिक मोहीम असणार आहे. एकुण 104 उपग्रहांचे वजन 1378 किलो असणार आहे. रशियाने 2014च्या जुलै महिन्यात एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता.