लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आमचा नारा 'जय भीम - जय मीम' असेल, असे येथे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे 'जय भीम - जय मीम' ही निवडणुकीची घोषणा आहे. याच्याजोरावर आम्ही निवडणूक लढविणार आहोत. समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच माळेची मणी आहेत, अशी टीका ओवेसी यांनी केली.


या निवडणुकीत आमची लढाई भाजप, सपा यांच्याविरोधात आहे. 'भारत माता की जय' ही घोषणा करणार नाही असे सांगणाऱ्या ओवेसींनी 'हिंदुस्थान जिंदाबाद' आणि 'जय हिंद'ची घोषणा दिली. आम्ही जाणतो ९० टक्के लोकशाही मानतो. त्यांचेच राज्य हवे. मात्र, समाजवादी पार्टीने गेल्या तीन वर्षांत असे काहीही केलेले नाही. तर काहींना RSSची परवानगी घ्यावी लागते. मात्र, आम्ही गरिबांसाठी लोकशाही मानतो, असे ओवेसी म्हणालेत.


मुजफ्फरनगरच्या मुद्दा ओवेसींनी उकरुन काढलाय. ५० हजार लोक बेघर झालेत, असे रिपोर्ट सांगतो. त्यासाठी दोन लोकांना  जबाबदार दाखवलेत. मात्र, सर्व प्रशासन याला जबाबदार आहे. दरम्यान, ओवेसींवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर आम्हीला कोणाच्या सर्टिफिकेटची जरुरी नाही, असे म्हटले.