नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे. 


यात महत्त्वाची बाब अशी आहे की नव्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफचे पैसे कापले जाणार नाहीत. पहिला तीन वर्ष सरकार पीएफचे पैसे जमा करणार आहे. सुरुवातीची तीन वर्ष सरकार आपली पीएफची ८.३३ टक्के भागीदारी उपलब्ध करुन देणार आहे.