श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काश्मिरमध्ये अशाप्रकारे बँक लूटण्याची ही दूसरी घटना आहे. गेल्या महिन्यात मध्य काश्मिरमधील बडगाम जिल्हातील एका बँकेतील रोकड काही अज्ञात बंदूकधाऱ्याकडून लूटण्याची घटना घडली होती.

नोटाबंदी निर्णयानंतर  बँक लूटण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही गुन्हेगारी जगतातील लोकांकडील काळापैसा निरूपयोगी ठरत आहे. त्यामुळे अशाप्रकारे बँका लूटून पैशाची गरज पूर्ण केली जात आहे. अशा घटनांना आवर घालण्यासाठी बँक सुरक्षा रक्षक बँकेतील लोकांवर करडी नजर ठेवणार आहेत