नवी दिल्ली : ५०० आणि १००० रुपयांच्या  नोटबंदीनंतर जनधन खात्यात पैसे जमा करण्यात  आले. दरम्यान, ज्या जनधन खात्यात पैसे नव्हते त्या खात्यांत कोट्यवधी रुपये जमा झाले. ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या  नोटा रद्द केल्या. त्यानंतर शून्य रक्कम असणारी जनधन खाती पैशांनी भरलीत. देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मोदी सरकारने आपल्याच बॅंक खात्यातून पैसे काढण्यावर मर्याता आणल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एटीएममधून एकाचवेळी केवळ २००० रुपये काढता येत आहेत. तर आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत आहे. आता जनधन खातेदारांनाही मर्यादा घालण्यात आली आहे.


 जनधन योजनेअंतर्गत खाते असलेल्या खातेदारांना आता अंकाँऊटमधून महिन्याला दहा हजार रुपये काढता येतील, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलीय. मात्र हि वाढीव रक्कम केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे. केवायसी पूर्ण नसलेल्या खातेदारांना महिन्याकाठी फक्त पाच हजार रुपये काढता येणार आहेत. दरम्यान खातेधारकाला त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल, असं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


जनधन खात्यात 65 हजार कोटी रुपये जमा आहेत. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशमधील खात्यामध्ये 10 हजार 670 कोटी रुपये जमा झालेत.