नवी दिल्ली : केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांनी समर्थन केलेय. सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी कौतुक केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयामुळे देशातील काळा पैसा तसेच भ्रष्टाचाराला चाप बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.  सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याने भ्रष्टाचारावर नियंत्रण येईल. त्यासोबतच परदेशातील काळा पैसा देशात येईल असे त्या म्हणाल्या.


नोटाबंदीच्या निर्णयानंतर पहिल्यांदा त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीये. राजस्थानातील एका कार्यक्रमासाठी त्या उपस्थित होत्या. यादरम्यान त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिल्या. तसेच केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.