नोटबंदीनंतर आता ईएमआयवर करा विमान प्रवास
नोटबंदीनंतर देशात रोख रक्कम व्यवहारात कमी येत आहे. त्यामुळे देशभरात रोख रक्कम कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्या देखील यामुळे प्रभावित आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज EMI वर लोकांना विमान सेवा देत आहेत. जेट एअरवेजने विमान सेवेसाठी तिकीट बुक करण्याचं आवाहन केलं आहे, त्यासाठी कंपनीने अॅक्सिस, एचएसबीसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्यासह अनेक बँकांसोबत करार केला आहे.
नवी दिल्ली : नोटबंदीनंतर देशात रोख रक्कम व्यवहारात कमी येत आहे. त्यामुळे देशभरात रोख रक्कम कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्या देखील यामुळे प्रभावित आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज EMI वर लोकांना विमान सेवा देत आहेत. जेट एअरवेजने विमान सेवेसाठी तिकीट बुक करण्याचं आवाहन केलं आहे, त्यासाठी कंपनीने अॅक्सिस, एचएसबीसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्यासह अनेक बँकांसोबत करार केला आहे.
कंपनीचे चीफ कमर्शल ऑफिसर जयराज शनमुगम यांनी म्हटलं की, 'भारत सध्या डिजिटल आणि फायनॅशल क्रांतीच्या दिशेने पुढे जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी, बुकिंगसाठी लोकं क्रेडिट कार्ड आणि इएमआयचा पर्याय देखील निवडत आहेत. आम्हाला आशा आहे की, ग्राहक ही योजनेचा पूर्ण उत्साहाने लाभ घेतील. वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंगसाठी ही ऑफर दिली जात आहे.
अॅक्सिस बँक, एचएसबीसी, आयसीआयसीआय, इंडसइंड, कोटक महिंद्रा आणइ स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे क्रेडिट कार्ड वापरुन ग्राहक तिकीट बुकिंग करतांना EMI चा पर्याय निवडू शकतात. क्रेडिट कार्ड होल्डर तिकीट बुकिंग दरम्यान ३, ६, ९, १२ महिन्यांचा पर्याय निवडू शकतात.