पणजी : गोव्याच्या डाबोलिन विमानतळावर आज पहाटे मुंबईला निघालेल्या विमानाचा एक मोठा अपघात थोडक्यात टळला. या विमानातील १५४ प्रवासी सुखरुप आहेत.


विमानतळावरून मुंबईकडे उड्डाण करताना जेट एअरवेजचं विमान धावपट्टीवरून खाली आली.   विमानतळवरच सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं असून सर्व जण सुखरुप आहेत. दरम्यान साडेबारापर्यंत गोव्यातली विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे.