काश्मीर : काश्मीरच्या कुपवाडामध्ये आज सकाळी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चकमकीत एका अल्पवयीन मुलीचाही बळी गेलाय, तर तिचा भाऊ आणि अन्य एक पोलीस जवान जखमी झालाय. 


कालारूस या गावामध्ये काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सकाळी पोलिसांनी गावामध्ये शोधमोहीम हाती घेतली. 


अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात कानिझा नावाची 12 वर्षांची मुलगी छर्रा लागल्यामुळे मृत्युमुखी पडली.