नवी दिल्ली: जेएनयूमध्ये दहशतवादी अफझल गुरुच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमावेळी भारताविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जेएनयूमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला दहशतवादी संघटना लष्कर ए तैयब्बाचा म्होरक्या हफीज सईदचा पाठिंबा होता, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.


 तसंच या प्रकरणाचं विरोधकांनी राजकीय भांडवल करु नये, भारताविरोधी घोषणा दिल्या जात असताना सगळ्या देशानं त्याविरोधात एकत्र येणं आवश्यक आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.


भारताविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी जेएनयूएसयूचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या अटकेविरोधात विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.