नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला JNU छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे जोरदार राडा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आजच्या सुनावणीपूर्वी पटियाला हाऊस कोर्ट परिसरात मोठा राडा झाला. कोर्ट परिसरात जमलेल्या वकिलांनी कन्हैय्याला धक्काबुक्की आणि मारहाण केली. यावेळी दगडफेकही झाली. या प्रकाराची माहिती काही वकिलांनी दिल्यानंतर सुप्रीम कोर्टानं या प्रकाराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.


विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं सकाळीच कन्हैय्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले होते. या प्रकारानंतर सर्वोच्च न्यायालयानं सहा ज्येष्ठ वकिलांची एक समिती गठित केली असून पतियाळा हाऊस कोर्ट परिसरातल्या कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.


कपिल सिब्बल, राजीव धवन, दुष्यंत दवे, ए.डी.एन. राव, अजित सिन्हा आणि हरीन रावल यांच्यावर ही जबाबदारी असेल. या समितीचा अहवाल येईपर्यंत कन्हैय्या कुमारची सुनावणी हतकूब करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिलेत.


जेएनयूनधला फरार आंदोलनकर्ता उमर खालिद आणि इतरांच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांनी मुंबई, उत्तर प्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये छापे मारलेत.


 


तसंच अफजल गुरूच्या फाशीला एक वर्ष झाल्यानिमित्तानं ज्या पद्धतीनं जेएनयूमध्ये कार्यक्रम करण्यात आला, तसाच कार्यक्रम देशभरातल्या अठरा विद्यापीठांमध्ये करण्याची तयारी होती. त्यासाठी उमर खालीद आणि त्याच्या मित्रांनी य़ा विद्यापीठांची रेकी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय.