जेएनयूमधल्या देशद्रोही निदर्शनांचा नवा व्हिडिओ आला समोर
जेएनयूमधल्या ९ फेब्रुवारीच्या देशद्रोही निदर्शनांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. यावेळी विद्यार्थ्यांसोबत काही बाहेरचे लोक असल्याचं स्पष्ट दिसतंय. कॅमेरे समोर आल्यावर हे लोक तोंड लपवताना दिसतायत.
नवी दिल्ली : जेएनयूमधल्या ९ फेब्रुवारीच्या देशद्रोही निदर्शनांचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. यावेळी विद्यार्थ्यांसोबत काही बाहेरचे लोक असल्याचं स्पष्ट दिसतंय. कॅमेरे समोर आल्यावर हे लोक तोंड लपवताना दिसतायत.
यामध्ये छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि उमर खालिद आहेत. उमर खालिद हा फरार असून दिल्ली पोलीस त्याचा शोध घेतायत. अफजल गुरूचं उदात्तीकरण करताना आझाद काश्मीरच्या घोषणा या निदर्शनांमध्ये देण्यात आल्यात. त्या देणारे तोंड लपवतायत. त्यांच्या वेशभूषेवरून ते काश्मीरी असल्याचं स्पष्ट दिसतंय.
ते जेएनयूचे विद्यार्थी नाहीत हे उघड आहे. मग त्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश कसा मिळाला, हा प्रश्न आहे. ही निदर्शनं म्हणजे एक मोठा देशविरोधी कट असल्याचं यातून दिसतंय. कन्हैय्या कुमारच्या चौकशीमधून यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जेएनयूमध्ये झालेल्या या देशद्रोही निदर्शनांची एनआयएद्वारे चौकशी करण्याची मागणी दिल्ली हायकोर्टानं फेटाळलीये. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं करत आहेत. केंद्र सरकारला गरज वाटल्यास NIAकडे चौकशी दिली जाईल. मात्र यामध्ये कोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. एक स्थानिक वकील रंजना अग्निहोत्री यांनी याबाबत याचिका केली होती.