कानपूर : कानपूर येथे इंदूर-पाटणा एक्सप्रेसमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना रेल्वेकडून तातडीने मदत जाहीर कऱण्यात आली. मात्र मदत म्हणून 500 रुपयांच्या जुन्या नोटा देत रेल्वेने या प्रवाशांच्य जखमांवरच मीठ चोळलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातातील पीडित रामकेवल यांची मुलगी या अपघातात मरण पावली. रामकेवल यांना तातडीने 5000 रुपयांची मदत देण्यात आली. मात्र त्या नोटा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. यात 100 च्या नोटांसह 500 रुपयांच्या जुन्या नोटाही होत्या. आता नोटांनी काय होणार आहे. माझ्या डोळ्यांदेखत माझ्या लहान मुलीने प्राण सोडले, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


रामकेवलच नाही तर काही प्रवाशांनाही अशा जुन्या नोटा देण्यात आल्या. रविवारी पहाटेच्या सुमारास कानपूरजवळइंदूर-पाटणा एक्सप्रेसेच 14 डबे रुळावरुन घसरल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 130हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. तर दोनशेहून अधिक जखमी झालेत. या घटनेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीही घटनास्थळी भेट दिली.