केट मिडलटनची फजिती सोशल मीडियावर वायरल
ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय.
मुंबई : ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय.
त्याचं झाल असं की इंडिया गेटवर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन उपस्थित झाले होते. यावेळी, श्रद्धांजली देण्यासाठी केट डोळे झाकून दोन मिनिटं स्तब्ध उभी राहिली. पण, नेमकं याच वेळात एक जोरात हवेचा झोका आला आणि त्यामुळे केटचा ड्रेस अक्षरश: हवेत उडाला.
केटला हे लक्षात आल्यानंतर तिनं लागलीच दोन्ही हातांनी आपला ड्रेस सावरला... यासाठी तिला बराच प्रयत्नही करावा लागला.
पण, नेमका हाच क्षण केटच्या फोटोंसहीत सोशल मीडियावर वायरल झालीय. 'टाईम्स'नं तर या क्षणाची तुलना 'मर्लिन मन्रो'च्या उडालेल्या ड्रेसशी केलीय.