आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला
केरळच्या कलाच्चीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आलीय.
कोझीकोडे : केरळच्या कलाच्चीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी क्रूड बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आलीय.
या हल्ल्यात संघाचे तीन कार्यकर्ते जखमी झालेत. जखमी कार्यकर्त्यांना कोझीकोड इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
मात्र, संघाच्या कार्यालयावर हा बॉम्ब हल्ला कुणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. केरळचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा शिरच्छेद कुणी करेल त्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कुंदन चंद्रावत यांनी केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.
केरळमध्ये डावे आणि संघ कार्यकर्त्यांमध्ये वादाच्या विविध घटना घडत असतात. या हल्ल्यानंतर संघाचे विचारक राकेश सिन्हा यांनी केरळच्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर हल्लाबोल केलाय.
मुख्यमंत्र्यांची फूस असल्याने डाव्यांकडून हिंसात्मक कारवाया केल्या जात असल्याचा आरोप सिन्हा यांनी केलाय.