मंत्रीमहोदय घाबरतात 13 नंबरच्या गाडीला
![मंत्रीमहोदय घाबरतात 13 नंबरच्या गाडीला मंत्रीमहोदय घाबरतात 13 नंबरच्या गाडीला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/05/31/185509-13-number.jpg?itok=Phvo-oEb)
स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे आणि अंधश्रद्धेवर सडकून टीका करणारे डावे पक्षही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत.
तिरुअनंतपुरम : स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणारे आणि अंधश्रद्धेवर सडकून टीका करणारे डावे पक्षही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. केरळमध्ये नुकत्याच निवडून आलेल्या डाव्यांच्या मंत्र्यांनी 13 या आकड्याची गाडी घ्यायला नकार दिला आहे.
केरळच्या मंत्र्यांसाठी 1 ते 20 क्रमांकाच्या गाड्या आहेत, पण यातला एकही मंत्री 13 नंबरची गाडी घ्यायला तयार होत नसल्यानं या सगळ्या मंत्र्यांवर टीका होत आहे. या टीकेनंतर अखेर अर्थमंत्री टी.एम. थॉमस आणि कृषीमंत्री व्ही.एस.सुनीलकुमार यांनी 13 नंबर असलेली गाडी घ्यायची तयारी दर्शवली आहे.