मुंबई : खिचडी हा पदार्थ अनेकांना आजारपणातील आहार वाटत असेल मात्र आजही खिचडी आरोग्यासाठी पोषक आहार मानला जातो. मुगडाळीच्या खिचडीत अनेक पोषकतत्वे असतात. मुगडाळीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहीत आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आवडता खाद्यपदार्थ खिचडीच आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान आले होते तेव्हा त्यांनी खिचडी खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. असंही म्हटलं जात की एक काळ असा होता की पंतप्रधान मोदी फक्त खिचडीच खायचे.


अशी ही खिचडी केवळ पौष्टिकच नाही तर त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या पर्वात खिचडी दान करण्याची प्रथा आहे. खिचडीमध्ये पोषक तत्वांचे योग्य संतुलन साधलेले असते. 


तांदूळ, डाळ, तूप शरीराला कार्बोहायड्रे, प्रोटीन, फायबर, व्हिटामिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळते.