जम्मू : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्राल परिसरात हिज्बुल मुजाहिदीनचे तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांनी त्या घरालं घेरलं. दहशतवाद्यांकडून त्यानंतर गोळीबार करण्यात आला. पोलीस कर्मचारी मंजूर अहमद यामध्ये शहीद झाले. सीआरपीएफचा एक जवान यामध्ये जखमी झाला. या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.


शोधमोहिम सुरु असताना स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केल्याचं बोललं जातंय. स्थानिक नागरिकांकडून बचाव करण्याचा प्रकार यापूर्वीही काश्मीरमध्ये घडला आहे.