नवी दिल्ली :  दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीवर अजय माकन यांची नियुक्ती झाल्यावर दिल्लीतील काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्वतःला दूर करत महापालिका निवडणुकांपूर्वी पक्षातून बाहेरचा रस्ता पकडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी काँग्रेस पक्ष संपला असल्याची टीका केली आहे. 


काँग्रेस नेते बंद खोल्यांमध्ये पंतप्रधान मोदींची करतात प्रशंसा 


लवली म्हणाले काँग्रेसच्या अनेक नेत्यांची काँग्रेसमध्ये दोन वर्षांपासून घुसमट होत आहे. त्यांना भाजपमध्ये सामील व्हायचे आहे. लवली म्हणाले बंद खोल्यांमध्ये अनेक काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करतात. 


अजय माकन हे काँग्रेस पक्षाचे व्हिलन आहेत. सर्व देशाला वाटते की काँग्रेस संपली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता ए के वालिया यांनी एमसीडी निवडणुकांमध्ये तिकीट विकले. त्यावरील आरोपांकडे कोणीही लक्ष दिले नाही.