`कोहिनूर` परत आणता येणार नाही : केंद्र सरकार
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता मावळली आहे. कारण कोहिनूर हिरा परत आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहिनूर हिरा भारतीय ऐश्वर्याचे प्रतीक मानलं जातं.
नवी दिल्ली : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता मावळली आहे. कारण कोहिनूर हिरा परत आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहिनूर हिरा भारतीय ऐश्वर्याचे प्रतीक मानलं जातं.
केंद्र सरकारने म्हटले आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारताबाहेर नेण्यात आलेल्या पुरातन, वा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तु देशात परत आणण्यासंदर्भातील कायद्याच्या मर्यादा आहेत. यामुळे कोहिनूर परत आणणे अवघड झाले आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे देण्यात आलेल्या उत्तरात म्हटलं आहे, 'कोहिनूर हा भारताबाहेर स्वातंत्र्यपूर्व काळात नेण्यात आला आहे, या प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार पुरातत्त्व खात्यास नाही'.
भारताबाहेर केवळ बेकायदेशीररित्या नेण्यात आलेल्या पुरातन वस्तुच देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा पुरात्व खात्यास अधिकार आहे, 1972 मध्ये हा कायदा संमत करण्यात आला होता.
या कायद्यानुसार कोहिनूर हिऱ्यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली दाखल करण्यात आलेल्या अर्जास उत्तर देण्यात आलं आहे. या उत्तरातून सरकारची भूमिका स्पष्ट होत आहे.