कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न - राजनाथ सिंग
कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू, असं आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील निवेदन देणार आहे.
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू, असं आश्वासन आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी लोकसभेत दिले. याप्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज देखील निवेदन देणार आहे.
आज लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मल्लिकार्जुन खडगे यांनी जाधव यांच्या प्रकरणात सरकरावर हलर्गीजीपणाचा आरोप केला. तर एमआयएमचे असददुद्दीन ओवेसी यांनी सरकारनं आपलं सामर्थ वापरून कुलभुषण जाधवांना वाचवावं असं आवाहन केलं.
तिकडे याप्रकरणी राजकारण न करता जाधवांना लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना रॉचा एजेंट ठरवून त्या्ंना फासावर लटवण्याची शिक्षा पाकिस्तानी लष्कर कोर्टानं दिलीय. पाकिस्तानच्या या कृ्त्यामुळं आज देशात संतापाची लाट आहे.