नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मैत्रीचं एक वेगळंच रुप बुधवारी पाहायला मिळालं.


आंतरराष्ट्रीय योग दिवस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं निमित्त साधून रामदेव यांनी लालूंच्या घरची वाट धरली होती. यावेळी, आपले बरेचसे प्रोडक्टही त्यांनी आपल्यासोबत घेतले होते. 


लालूंना आपल्या हातांनी भरवलं...


यावेळी, लालूप्रसाद यादव यांनी पतंजलीच्या अनेक वस्तूंचं जोरदार कौतुक केलेलं दिसलं... तर रामदेव यांनी अनेक गोडधोड मिठाई आपल्या हातांनी लालूंना भरवताना यावेळी पाहायला मिळाले. 


लालूंचा क्रिमनं फेसमसाज


यावेळी, रामदेवांनी आपल्या गोल्ड क्रिमनं लालूंच्या चेहऱ्यावर मसाजही करून दिला. यानंतर मागे राहतील ते लालू काय... त्यांनीही मग, ही क्रिम कशी बेस्ट आहे आणि पतंजली त्याला कसं स्वस्त किंमतीत लोकांना उपलब्ध करून देतंय, याचं तोंडभरून कौतुक केलं.