लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल
लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. बर्फात फिरत असलेल्या या दहशतवाद्यांचा हा व्हीडिओ काश्मीर परिसरात बनवण्यात आला.
जम्मू : लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. बर्फात फिरत असलेल्या या दहशतवाद्यांचा हा व्हिडिओ काश्मीर परिसरात बनवण्यात आला.
या व्हिडिओत पहिल्या काही दृष्यांमध्ये बर्फातून चालत असलेले आणि काश्मीर वेशातील दहशतवादी दिसतातयत. तर पुढील काही दृष्यात एका खोलीत त्यांची भेट होतानाची दृष्य दिसत आहेत.
खोलीत सर्व दहशतवादी एकत्र जमा होत बोलतानाच्या या दृष्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान या व्हिडीओनंतर सुरक्षा यंत्रणानी सतर्कता वाढवली आहे.