नवी दिल्ली : दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. डाव्यांच्या आयसा-एसएफआय आघाडीचा झेंडा जेएनयूवर फडकला आहे. 


जेएनयूमधल्या चारही जागा या डाव्या आघाडीनं जिंकल्या आहेत. डाव्या आघाडीच्या मोहित पांडेची अध्यक्षपदी, तर अमल पीपीची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर शतरुपा चक्रवर्ती महासचिव आणि तबरेझ हसन सहसचिव म्हणून निवडून आले आहेत.