नवी दिल्ली : १३ मार्चपासून एटीएम, बँकेतून पैसे काढण्यावरची मर्यादा हटणार आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत घोषणा केली आहे. आरबीआयच्या पतधोरण आढाव्यात व्याज दर जैसे थेच ठेवण्यात आले आहे. महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा सावधगिरीचा उपाय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीनंतर देशात पैशांची कमतरता भासू लागली. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने पैशे काढण्यावर मर्यादा ठेवली होती. मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर आल्यानंतर सरकारने अनेक उपाययोजना केल्या. या काळात अनेक निर्णय घेण्यात आले.


नोटबंदीनंतर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी याचा विरोध देखील केला. काही दिवस लोकांना याचा त्रास झाला पण परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. आणि आता पूर्णपणेच मर्यादा काढून टाकण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे.