भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे की, राज्यात टप्प्याटप्प्याने दारुची सगळी दुकाने बंद केली जाणार आहे आहेत राज्यात दारुबंदी लागू करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सुरु नर्मदा सेवा यात्रेच्या ११३ व्या दिवशी नरसिंहपूर जिल्ह्यातील नीमखेडा गावात जनसंवाद कार्यक्रमात चौहान यांनी म्हटलं की, राज्यात टप्प्याटप्प्याने दारु बंदी केली जाईल. सुरुवातील नर्मदा नदीच्या दोन्ही किनाऱ्या भोवतीचे ५ किलोमीटरपर्यंतची दुकाने एक एप्रिलला बंद केली गेली. पुढच्या टप्प्यात आता रहिवासी भागात शिक्षण संस्था आणि धार्मिक स्थाळांच्या आजुबाजूची दारुची दुकाने बंद केली जाणार आहेत. चौहान यांनी म्हटलं की, मध्यप्रदेशात दारुमुक्ती आंदोलन केलं जाणार आहे.


मागील महिन्यात राज्यातील विविध भागामध्ये दारुबंदीसाठी लोकांनी निदर्शनं केली. काही भागात या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं. एका महिन्यात इंदौर, सागर, बुरहानपूर, छतरपूर, विदिशा, नरसिंहपूर, सतना, मुरैना, देवास आणि आणखी काही भागांमध्ये लोकांनी दारुबंदीसाठी निदर्शनं केली.