मुंबई : ये इश्क नहीं आसां बस इतना समझ लीजे, एक आग का दरिया है और डूब के जाना है असं प्रेमाबाबत म्हटलं जातं. गेल्या १५ वर्षातील प्रेमामुळे बळी गेलेल्यांची संख्या पाहिल्यास ज्यांनी कोणी ही शायरी लिहिलीये त्यांनाही प्रेम इतकं घातक असेल याची कल्पना नसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात गेल्या १५ वर्षात दहशतवादी हल्ल्यातील बळींपेक्षा अधिक बळी प्रेमामुळे गेल्याची माहिती समोर आलीये. २००१ ते २०१५ या कालावधीत तब्बल ३८,५८८ लोकांनी प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे समोर आलेय. इतकेच नव्हे तर प्रेमात अपयशी ठरल्यानंतर तसेच अन्य कारणामुळे आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण गेल्या १५ वर्षात ७९,१८९ इतके आहे.


दरम्यान, या कालावधीत अपहरणाच्या २.६ लाख तक्रारी दाखल झाल्यात. ज्यात मुख्यत्वेकरुन महिलांचे अपहरण हे एकतर्फी प्रेमातून अथवा तिच्याशी लग्न कऱण्याच्या इराद्याने झालेय. 


सरकारी आकड्यांनुसार, प्रत्येक दिवसाला प्रेमप्रकरणातून ७ हत्या, १४ आत्महत्या आणि ४७ अपहरणाच्या घटना घडतात. तर दुसरीकडे दहशतवादी घटनांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या २० हजार इतकी आहे. 


आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रेमप्रकरणातून हत्या, आत्महत्या तसेच अपहरणाच्या घटना अधिक घडल्यात.