नवी दिल्ली : टॅक्स बुडवला तर तुमची गॅस सब्सिडी रद् केली जाणार आहे, तसेच टॅक्स बुडवल्यावर तुमचा पॅन नंबरही ब्लॉक केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आयकर विभागाने हा निर्णय घेतला असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे, एवढंच नाही तर तुम्ही टॅक्स बुडवला तर तुम्हाला कर्ज सुद्धा नाकारलं जाणार आहे.


त्याचप्रमाणे आयकर विभाग अशा व्यक्तींना कुठल्याही बँकेतून कर्ज मिळणार नाहीत, याचीही खातरजमा करणार आहे.  देशात करबुडव्यांचं वाढतं प्रमाण बघता आयकर विभागानं हे जालीम उपाय करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या वर्षी वीस कोटीं रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या कर बुडवणाऱ्यांची हॉल ऑफ शेम नावानं एक यादी जाहीर केली होती.  आता ही मर्यादा एक कोटी रुपयांवर आणण्यात येणार आहे.


एकंदरीत टॅक्स बुडवणे आता महागात पडणार असल्याचं आयकर विभागाच्या निर्णयावरून दिसून येत आहे. केंद्र सरकारने  यापूर्वी ज्यांना गरज नाही अशा कुटुंबांनी आपली गॅस सब्सिडी घेऊ नये, यातून गरजूवंतांना गॅस सब्सिडीचा लाभ देता येईल असं म्हटलं आहे.