नवी दिल्ली :  देशात कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने डिजिटल पेमेंटवर बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव 'लकी ग्राहक योजना' असून यात डिजिटल पेमेंटवर कॅश बक्षीस देण्यात येणार आहे. रोज १५ हजार लोकांना १००० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता २५ डिसेंबरला पहिला लकी ड्रॉ असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच १४ एप्रिल २०१७ ला ३ मेगा ड्रॉ असणार आहेत. त्यात तीन वेगवेगळ्या विजेत्यांना १ कोटी, ५० लाख आणि २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 


 



नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत  यांनी या योजनेची घोषणा केली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) पुढील १०० दिवसांसाठी १५ हजार ग्राहकांना १००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. याची सुरूवात क्रिसमसपासून म्हणजे २५ डिसेंबर पासून होणार आहे. 


 



या शिवाय व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापारी योजनाचे घोषणा केल आहे. या माध्यमातून डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी  दर आठवड्याला ७ हजार व्यापाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रत्येक व्यापाऱ्याला जास्ती जास्त ५० हजार रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.