छोट्या-मोठ्या सर्व कार महागणार
भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.
नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.
याशिवाय लक्झरी गाड्यांच्या किंमतीही महागणार आहे. एययूव्हीवर टॅक्स ४ टक्क्यांनी वाढवण्यात आलाय. तसेच १० लाख आणि त्याहून अधिक किंमतीच्या गाड्यांवर एक टक्का अधिक सरचार्ज लावण्यात येणार आहे.
छोट्या कारवरील टॅक्स एक टक्के आणि डिझेल कारवर २.५ टक्के कर वाढवण्यात आलाय. महाग झालेल्या वस्तूंमध्ये तंबाखू उत्पादनांचा समावेश आहे. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्याच्या दागिन्यांच्या किंमतीतही वाढ होणार आहे.