चेन्नई : तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललितांच्या जवळच्या लोकांनी त्यांच्याबदद्ल जी गुप्ततता बाळगल्याप्रकऱणी सुटीच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. जयललिता यांच्या मृत्यूबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने साशंकता व्यक्त केली आहे. आमच्या मनातही काही शंका आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. याबाबत अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते पीए जोसेफ यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. वैद्यनाथन आणि न्यायमूर्ती परथीबान यांनी हे मत व्यक्त केले.


जयललितांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याचा आदेश का देऊ नये ? असा सवाल करत मद्रास उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, तामिळनाडू राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. ७५ दिवस रुग्णालयात काढल्यानंतर ५ डिसेंबरच्या रात्री जयललितांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. ६ डिसेंबरला चेन्नईच्या मरीना बीचवर एमजीआर यांच्या स्मारकाशेजारी जयललितांचा दफनविधी करण्यात आला. 
 
दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतरही त्यांच्या वैद्यकीय स्थितीची माहिती देणारी कागदपत्रे का सादर केली नाही, असा सवाल न्यायालयाने विचारला. जयललिता यांच्यावर जे उपचार करण्यात आले त्याचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी जोसेफ यांनी केली. या याचिकेवर पुढील सुनावणी ९ जानेवारीला होईल.