नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन निमित्तानं महाराष्ट्रानं सादर केलेल्या चित्ररथाला, तिस-या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. दिल्लीत राजपथावर शानदार संचलन कार्यक्रमात, महाराष्ट्रानं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर आधारीत चित्ररथ सादर केला होता.


लोकमान्य टिळकांच्या 160 व्या जयंती निमित्तानं हा देखावा साकारण्यात आला होता. दरम्यान अरुणाचलप्रदेश राज्याच्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचं, तर त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाला दुस-या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे.