नवी दिल्ली : ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. 
 
नोटाबंदीचा निर्णय सरकारनं मागे घ्यावा, अशी मागणी करत तृणमूल काँग्रेसनं हा मोर्चा काढलाय. ही मागणी ममता बॅनर्जी राष्ट्रपतींसमोर मांडणार आहेत. ममता बॅनर्जींसोबत मोर्चात शिवसेनेचे खासदारही राष्ट्रपती भवनात दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीसह सर्व मु्द्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यानुसार राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून गरीबांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केलाय. 


या आरोपांना सरकारकडून पियूष गोयल यांनी उत्तर दिलं. आज लोकसभेचं कामकाज शोकप्रस्ताव मांडून स्थगित करण्यात आलंय. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानं सामान्य माणासाचे अतोनात हाल आहेत. हे हाल कमी करण्यासाठी सरकारानं ताताडीनं पावलं उचलवीत, अशी विरोधकांची मागणी आहे. 


कामकाज सुरू होण्याआधी संसदेच्या परिसरात असणाऱ्या गांधींजी पुतळ्यापुढे निदर्शनं करण्यात आली.