मुंबई : हॉरर सिनेमे बघणं हे सगळ्यांना शक्य नसतं. सिनेमा जर तुम्ही रात्री बघत असाल तर अजूनच भितीदायक. हॉरर सिनेमा ‘The Conjuring 2’ बघतांना एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूतील तिरुवन्नमलयमध्ये घडली आहे. 


सिनेमाचा शेवट पहाताना अचानक या वृद्ध माणसाच्या छातीत दुखू लागलं. थिएटरमधल्या माणसांनी रुग्णवाहिका बोलावली पण त्यापूर्वीच माणसाचा मृत्यू झाला होता. ‘The Conjuring 2’ हा हॉरर सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. मृत्यूचं खरं कारण अजून माहित नसलं तरी प्रत्यक्षदर्शी माणसांकडून सिनेमा पाहूनच मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे.