नवी दिल्ली : किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्याचा धक्का बसला ना! पण, हे मनमोहन सिंग म्हणजे देशाची माजी पंतप्रधान नाही तर उत्तरप्रदेशातील एक सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. ते विजय माल्ल्याच्या कर्जाला जबाबदार असल्याचं बँकांनी कागदोपत्री दाखवलंय... इतकंच नाही तर हेच मनमोहन सिंग विजय माल्या यांच्या कंपनीचे डायरेक्टर असल्याचंदेखील दाखवण्यात आलंय. 


शेतकऱ्यांचं अकाऊंट सीझ


आश्चर्याची बाब म्हणजे, या गरीब शेतकऱ्याला विजय माल्या कोण व किंगफिशर काय आहे हेदेखली माहीत नाही. तर दुसरीकडे, माल्याच्या कर्जाला गॅरेंटर राहिलेल्या या शेतकऱ्याचं खातं गोठवण्याचे आदेश बैंक ऑफ बड़ौदाच्या मॅनेजरला मुंबईच्या रीजनल ऑफिस मधून देण्यात आलेत.


माल्याची तोंडओळख देखील नाही...


मनमोहन सिंहच म्हणणं आहे की त्यांनी माल्याला फक्त टीव्ही व पेपर मध्येच पाहील आहे. मीडियाच्या माहितीनुसार, यूपीमधील पीलीभीत इथं राहणाऱ्या मनमोहन सिंह यांचे 'बँक ऑफ बड़ौदा'मध्ये दोन खाती आहेत.