मुंबई : रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये होणारा प्रत्येक मृत्यू हे १२५ कोटी भारतीयाचं नुकसान आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. शिवाय लहान मुलांना हिसेंच्या आगीत लोटून आपला स्वार्थ साधणाऱ्यांना कधीतरी उत्तर द्यावं लागेल, असा सज्जड इशाराही यावेळी पंतप्रधानांनी दिला.


'मन की बात'ची सुरूवात पंतप्रधानांनी रिओतल्या यशस्वी महिला क्रीडापटूंविषयी गौरवोद्गारांनी केली. त्याचप्रमाणे पुढच्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी उंचावण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याचंही मोदींनी यावेळी म्हटलंय.


महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याच्या गणेशोत्सावातून सुराज्याचा संदेश देण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं.  शिवाय गणेशोत्सव आणि दुर्गापूजा दोन्हीही उत्सव इको फ्रेन्डली पद्धतीनं साजरा करण्याची सूचनाही मोदींनी केलीय.  मदर तेरेसांना देण्यात येणारं संत पद, गंगा स्वच्छतेसाठी पाच राज्यांनी अलाहबादमध्ये घेतलेली सरपंचांची परिषद, शौचालयासाठी देशभरात होणारा आग्रह याविषयी मोदींनी खुमासदार किस्से सांगितले.  


इथे ऐका पंतप्रधानांचं संपूर्ण भाषण 


<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/gWCJQBpYDRY?rel=0" frameborder="0" allowfullscreen></iframe>